पालघर- वसईतील खदाणीत दोन अल्पवयीन मुली बुडाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईहून आपल्या मित्रांसोबत दोन्ही मुली शाळा बुडवून वसईला फिरायला आल्या होत्या.
मुंबईतील 2 शाळकरी मुली वसईच्या खदाणीत बुडाल्या; शोधकार्य सुरू - two girls Drowned in vasai
मुंबईतील दोन मुले आणि दोन मुली शाळा बुडवून वसईत फिरायला आले होते. त्यावेळी एका खदानीत दोन मुली बुडाल्या असून त्यांचा शोध सुरु आहे.
वांद्रे येथील 9 वीत शिकणारे 2 मुले आणि सातवीत शिकणाऱ्या 2 मुली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वसई पूर्व येथील राजीवली परिसरातील खदाणीत बुधवारी (दि. 12 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हे मुले-मुली फिरायला आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुली बुडाल्या आहेत. त्यानंतर वसईचे वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून मुलींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -'स्थानिक जनतेला वाढवण प्रकल्प नको असल्यास आम्ही जनतेसोबत'