पालघर - लोकसभेचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. मुरबे येथेल एका विकास कामाची पाहणी करताना खासदार यांच्या तोंडावर मास्क नसल्याचा प्रकार समोर आला असून त्यातच खासदारांच्या भोवती त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा गराडा पाहायला मिळाला.
लोकप्रतिनिधींना कोरोना नियमांचा विसर लोकप्रतिनिधींना कोरोना नियमांचा विसर-
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आपल्या भाषणातून करतात. त्याचप्रमाणे पालघरमध्ये सध्या 50 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. असे असताना देखील पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित हे नियमांची पायमल्ली करताना दिसून आले.
राजेंद्र गावित पालघर तालुक्यातील मुरबे येथील बंदर विकास कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. जर लोकप्रतिनिधिंना अशाप्रकारे कोरोना बाबतच्या नियमांचा विसर पडला असेल तर सामान्य नागरिकांवर कारवाई का? सामान्य नागरीकांना वेगळा न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का, असा सवाल सध्या पालघरकर विचारत आहेत.
हेही वाचा-हक्कभंग प्रकरणात संपादक अर्णब गोस्वामी यांना समन्स