महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार राजेंद्र गावितांची पूरग्रस्त भागाला भेट; पूरग्रस्त बोरांडा रहिवासीयांना शासकीय धनादेशाचे वाटप - Wada Naib Tahsildar Ritali

खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील इतर पदाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी पुरपरिस्थितीची पाहाणी केली. यावेळी खासदार राजेंद्र गावित व आदींच्या उपस्थितीत बोरांडा येथील १०४ जणांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रूपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

खासदार राजेंद्र गावितांचा पूरग्रस्त भागाला भेट

By

Published : Aug 9, 2019, 8:19 AM IST

पालघर (वाडा)- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ४ ऑगस्टला पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. आलेल्या पुरात बोरांडा गावातील वैतरणा नदीकाठच्या घरांना नुकसान झाले होते. ८ ऑगस्ट रोजी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या भागातील पूर परिस्थितीची पाहणी केली व नुकसान ग्रस्त लोकांना धनादेश व इतर साहित्य वाटप केले.

खासदार राजेंद्र गावितांचा पूरग्रस्त भागाला भेट

खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील, वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, वाडा नायब तहसीलदार रिताली परदेशी व इतर पदाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी केली. यावेळी खासदार राजेंद्र गावित,नंदकुमार पाटील, प्रांताधिकारी अर्चना कदम आदींच्या उपस्थितीत बोरांडा येथील १०४ जणांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रूपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

वाडा तालुक्यात ४ ऑगस्टला वैतरणा नदीला मोठा पूर आला होता. यात बोरांडा गावातील नदी लगतच्या घरांना मोठे नुकसान झाले होते. यावेळी शासनाकडून या गावातील लोकांना इतत्र हालविण्यात आले होते. या कार्यात धाडस करून मदत करणाऱ्या व्यक्तींचा देखील खासदारांकडून वैयक्तिक कौतूक करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details