पालघर - कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेल्या पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर कित्येक जणांचा मृत्यू या पुरामुळे झाला आहे. अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वच स्तरातून मदत केली जात आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीही पूरग्रस्त भागातील रहिवाशांना मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत दिला आहे.
पालघरचे खासदार गावितांची पूरग्रस्तांना लाखाची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला धनादेश - खासदार
पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्थांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला एक लाखांचा धनादेश दिला.
खासदार गावितांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला लाखाचा धनादेश
राजेंद्र गावित यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्याकडे हा एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूरग्रस्थांना मदत करण्याचे आवाहन दिले.