पालघर- परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी पुन्हा आर्यन स्कूलच्या मैदानावर गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.
पालघर रेल्वे स्थानकातून आज प्रतापगड, जौनपूर वदोही या तीन ठिकाणी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र काही कारणास्तव प्रतापगड व वदोही येथे जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. आज फक्त उत्तरप्रदेशातील जौनपूरसाठी श्रमिक रेल्वे रवाना होणार आहे. त्यानुसार या सर्व नोंदणी केलेल्या कामगार, मजुरांना आज आर्यन हायस्कूल मैदानात येथे टोकन देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांनी टोकन घेण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी केली आहे.