महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचे पालघरमध्ये आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - increased electricity bill mns protest

वाढीव वीजबिलांविरोधात पालघर येथे मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून वीजबिल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. जनतेने ही वाढीव बिले भरू नये, असे आवाहन देखील मनसेच्या वतीने करण्यात आले.

increased electricity bill oppose mns
वाढीव वीजबिलांविरोधात मनसचे पालघरमध्ये आंदोलन

By

Published : Nov 26, 2020, 3:55 PM IST

पालघर - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाढीव वीजबिलांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. तसेच, काही मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलना आधीच ताब्यात घेतले. जुन्या पालघर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोरोना काळात वाढीव वीजबिल जनतेवर अन्याय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रिडींग व वीजबिल वाटप केले. कोरोना काळात जनतेची आर्थिक गणिते कोलमडली असताना वाढीव वीज देयके म्हणजे जनतेवर भुर्दंड होते. एकीकडे जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना तिला आर्थिक दिलासा देण्याऐवजी आवाजवी वीजबिल देऊन तिची दिशाभूल करत महाविकास आघाडी सरकारने तिचा विश्वासघात केला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

माहिती देताना पालघर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष समीर मोरे

वीजबिल दरवाढ रद्द करा

लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली होती. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जा मत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. तसेच, या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे.

हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अंबोली येथे माकप आणि कष्टकरी संघटनेचा रास्ता रोको

ABOUT THE AUTHOR

...view details