पालघर - तोक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यातील उसरणी, कोरे या गावांना भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी आज भेट दिली. दरम्यान, त्यांनी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटपही केले.
आमदार मनीषा चौधरी यांची नुकसानग्रस्तांना मदत - पालघर जिल्हा
तोक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यातील उसरणी, कोरे या गावांना भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी आज भेट दिली.
पालघर तालुक्यातील उसरणी, कोरे या भागात आमदार मनीषा चौधरी यांनी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले. यामध्ये १५०० सिमेंट पत्रे, १००० ब्लँकेट आणि एलईडी बल्ब आदींचे वाटप करण्यात आले. तसेच, कोरे येथील काशी प्रसाद बोटीचे मालक मोहन वैद्य, हरबादेवी बोटीचे मालक धनाजी धनू, उसरणी येथील मातेश्वरी बोटीचे मालक किशोर तरे, लक्ष्मीमैया बोटीचे मालक रमेश वैद्य यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजप पदाधिकारी, उसरणी सरपंच उपस्थित होते
हेही वाचा -विरार : रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण, गुन्हा दाखल