महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट, चुलत भावानेच केली होती हत्या - दहशतवाद विरोधी कक्ष news

तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचा छडा पालघर दहशतवाद कक्षाकडून करण्यात आला आहे. मृताच्या चुलत भावानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याला केरळमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

वाडा पोलीस ठाणे

By

Published : Sep 29, 2019, 11:42 PM IST

पालघर- तीन वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचा छडा पालघर दहशतवाद विरोधी कक्षाकडून करण्यात आला आहे. मयत अमीन-उल-हक मोहम्मद मनुताज (मुळ रा. आसाम) तो पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील उसर येथील फार्म हाऊस काम करीत होता. त्याचा खून चुलत भावाने करून फार्म हाऊसमधील शौचालयाच्या टाकीमध्ये टाकला होता. खूनी मन्सूर मोहम्मद अकबर अली याला केरळ येथून ताब्यात घेऊन पालघरला आणण्यात आले आहे.

हेही वाचा - पालघर येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून दोन जण जखमी


त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत अमीन-उल-हक हा हरवल्याची तक्रार 28 सप्टेंबर, 2016 रोजी वाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तो अल्पवयीन असल्याचे प्रमाणपत्र 17 मार्च, 2017 सादर केल्यानंतर वाडा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. च्या कलम 363 प्रमाणे कक्ष पालघर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. बेपत्ता होण्यापूर्वी मयत अमीन-उल-हक हा केरळ आणि कर्नाटक या राज्यातील लोकांच्या निदर्शनास आला होता.

हेही वाचा - विक्रमगडमध्ये बनावट मद्य तयार करण्याच्या गोदामावर छापा, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

समाजविघातक किंवा देशविघातक लोकांच्या संपर्कात आल्याच्या शक्यतेने तपास करण्यासाठी दहशतवादी विरोधी कक्षाकडे हा तपास देण्यात आला. डिसेंबर 2018 ते आजपर्यंत तपास करीत त्याच्या खून करणाऱ्या चुलत भावाला केरळमधून अटक केली आहे. हा गुन्हा 2016 साली घडला होता. या गुन्ह्याची कबुली आरोपी मन्सूर याने पालघर तपासाअंती दिली. फार्म हाऊसच्या शौचालयामधून खून झालेल्या मयत अमीन-उल-हक याचा सांगाडा बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा - पालघरच्या गोऱ्हे फाट्यावरील रस्त्याची झाली चाळण

या गुन्ह्याची उकल सहायक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांचे सहकारी यांनी केली. या प्रकरणी वाडा पोलिसांनी आरोपीस अटक करून अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details