पालघर - काही विभागांनी जिल्हा विकास निधी कमी खर्च केल्यामुळे हा निधी शासन जमा होवू नये, यासाठी सर्व अधिकाऱ्यांना कामे वेळत पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.
जिल्ह्याचा विकास निधी वेळेवर खर्च करण्याच्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना - पालकमंत्री दादा भुसे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
पालघर जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारा निधी काही विभागांनी कमी खर्च केला आहे. हा निधी वेळेत खर्च न केल्यास पुन्हा शासन जमा होतो. हा निधी शासन जमा होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी गुणवत्ता टिकवून आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही कामे वेळत पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा -पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साडेचार तासात पूर्ण केली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा
पालघर जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारा निधी काही विभागांनी कमी खर्च केला आहे. हा निधी वेळेत खर्च न केल्यास पुन्हा शासन जमा होतो. हा निधी शासन जमा होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी गुणवत्ता टिकवून आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही कामे वेळत पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करून त्यातून विकास कामांना वेग देण्यात येईल. असे भुसे यांनी नियोजन बैठक संपन्न झाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.