महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस - palghar

तीन महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीला आपण तिच्याशी प्रेम करतो सांगत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगगळ्या ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, बालन्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Miner girl physical abused

By

Published : Mar 2, 2019, 8:12 PM IST

पालघर - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मनोर येथे घडली. या प्रकरणातील आरोपी देखील अल्पवयीन असून पीडिता गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Miner girl physical abused

मनोर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हे दोघेही राहत होते. तीन महिन्यांपूर्वी आरोपीने या मुलीला आपण तिच्याशी प्रेम करतो सांगत तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगगळ्या ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित केले. घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तो तिला दम देत होता. मात्र, पीडिता दोन महिन्याची गर्भवती आहे, असे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांना हा प्रकार कळला.
त्यांनी पीडितेला घेऊन मनोर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून मनोर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. मनोर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल न्यायालयात हजर केले असता, बालन्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details