पालघर - नवीन वर्षात मीरा भाईदर शहरात मेट्रोचे काम अधिक वेगाने सुरू झाले आहे. भविष्यात शहरात मेट्रोमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३ मोठे फ्लायओव्हर असलेला 'एलिव्हेटेड रस्ता' ही या प्रकल्पात आता उभारला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त २१७ कोटी रुपये इतका निधी आमदार प्रताप सरनाईक यांनी 'एमएमआरडीऐ'कडून मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे जलद गतीने सुरू असलेले हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होऊन २०२२ मध्ये मीरा भाईंदरकारांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मीरा भाईदरकरांचे मेट्रोचे स्वप्न २०२२ मध्ये होणार पूर्ण, अतिरिक्त २१७ कोटीच्या खर्चाला मंजुरी - News about the Meera Bhayandar Metro
नवीन वर्षात मीरा भाईदर शहरात मेट्रोचे काम अधिक वेगाने सुरू झाले आहे. २०२२ पर्यंत मीरा भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न पूण होणार आहे.
मेट्रो व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी कामाची पाहणी करताना मेट्रो प्रकल्पाबाबतची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. मीरा भाईदर मेट्रोच्या कामासह ३ मोठे फ्लायओव्हर असलेला 'एलिव्हेटेड रस्ता' ही या प्रकल्पात आता उभारला जाणार आहे. शहरात भविष्यात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एलिव्हेटेड रस्ता व त्यात 3 मोठे फ्लायओव्हर बांधले जाणार आहेत. कोणत्याही स्थितीत मीरा भाईदर मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सरनाईक प्रयत्न करत आहेत. त्यांनी एमएमआरडीए व पालिका अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केली. या पहानी नंतर मेट्रो व 'एलिव्हेटेड रस्ता' असे काम पुढील २ वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. प्रकल्पात करण्यात आलेल्या अधिक बदलामुळे पुढील ५० वर्षाचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. त्याचसोबत मीरा भाईंदर महापालिकेकडून या प्रकल्पात येणारे अडथळे आणि लागणारी मदत ही महापालिका करत असल्याचे महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले.