महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

माकपने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहिर केला

By

Published : Mar 21, 2019, 10:24 PM IST

पालघर- लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तसेच यावेळी पहिल्यांदाच माकप पालघर लोकसभेची जागा लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिले. पालघरमधील मनोर येथे आज बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि अशोक ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.

दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकप आग्रही असून या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही जागा दिली जात नसल्याने माकपकडून पालघरसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. पालघरमध्ये माकप, बहुजन विकास आघाडीला मदत करणार असून दिंडोरी येथे बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिले. सत्तेतील शिवसेना-भाजपला हरवणे हे एकमेव उद्दिष्ट असून वेगळे लढल्याने माकप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांचे नुकसान होईल. तसेच भाजप सरकारकडून जनतेची झालेली फसवणूक यामुळे भाजप सरकार विरोधात बहुजन विकास आघाडी एकत्र आल्याचे, मत दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आले.

माकपने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहिर केला

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड हे तालुके माकपचे वर्चस्व आहे. ८ महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने बहुजन विकास आघाडी ३ नंबर तर माकप ४ नंबरवर राहिला होता. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माकपने आणि बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने बहुजन विकास आघाडीची ताकद अधिकच वाढली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हमखास विजय होतील, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details