सराईत सोनसाखळी चोरास माणिकपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगाराला माणिकपूर पोलिसांनी अटक केली. सुरेंद्र सिंग अजित सिंग नेगी(३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले.
सराईत सोनसाखळी चोरास माणिकपूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या
पालघर -माणिकपूर पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी (स्नॅचिंग) करण्या-या सराईत गुन्हेगारास अटक केली. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.