पालघर- शहरातील भाजी मार्केट येथे बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला भाजी मार्केटमधील साईबाबा मंदिर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजी मार्केटमधील दोन भाजी विक्रेत्यांना त्याने १०० रुपयांच्या खोट्या नोटा देऊन गंडा घातला आहे.
वृद्ध लक्ष्मीबाई शिरसाठ या शहर भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करत होत्या. त्यादरम्यान संजय गुप्ता नामक एका व्यक्तीने त्यांच्याकडून भाजी विकत घेतली व त्यांना १०० रुपयाची नोट दिली. दिलेली नोट खोटी असल्याच्या संशयावरून लक्ष्मीबाई यांनी ती नोट आपल्या मुलाला दाखविली. ही नोट खोटी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी संजय गुप्ताला पकडून ठेवले. त्यानंतर सदर प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.