महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर : हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन - मनसे आंदोलन

हाथरस घटनेविरोधात पालघरमध्ये मनसेकडून आंदोलन करून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन
हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन

By

Published : Oct 6, 2020, 9:28 PM IST

पालघर - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा देशभर संताप व्यक्त होत आहे. पालघर येथील हुतात्मा चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात घोषणा देत या कृत्याचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. याप्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी मनसैनिकांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील या घटनेने देशाला पुन्हा एकदा हादरवून टाकले असून या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील दलित समाजातील 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल करण्यात आले. पीडितेला जिवंत असतानाही यातना देण्यात आल्या आणि मृत्यूनंतरही तिची अवहेलना करण्यात आली. त्या पीडितेवर अत्यंसंस्कार करण्याचा हक्कही निर्दयी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिला नाही. तसेच पीडित कुटुंबियाना विरोधी पक्षनेते व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटू दिले गेले नाही. उत्तर प्रदेशातील भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठला असून त्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details