महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या छतावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू - death

कंपनीच्या छतावर पत्रे चढविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली.

मृत आरिफ खान

By

Published : Jul 17, 2019, 4:08 AM IST

पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जे. 10 विनीत प्रेस कंपनी येथील एका कामगाराचा कंपनीच्या छतावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरिफ खान (वय 22) असे या मृत कामगाराचे नाव आहे.

या घटनेनंतर काही काळ दवाखान्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कंपनीच्या छतावर पत्रे चढविण्याचे काम सुरू होते. मात्र, हे काम करत असताना कोणत्याही प्रकारचे संरक्षक उपकरण, संरक्षक पट्टा घातले नव्हते. त्यामुळे 40 ते 50 फूट उंच कंपनीच्या छतावरून खाली पडुन या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details