महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माकप आमदाराविरुद्ध सेना आमदारांचा रंगला कबड्डी सामना - शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा

चंद्रनगर केंद्रशाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय  शालेय क्रीडा स्पर्धेत बुधवारी डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले विरुद्ध पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यात कबड्डीचा सामना रंगला.

कबड्डी खेळताना आमदार
कबड्डी खेळताना आमदार

By

Published : Dec 5, 2019, 3:21 PM IST

पालघर- चंद्रनगर केंद्रशाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत बुधवारी डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले विरुद्ध पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यात कबड्डीचा सामना रंगला. त्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली. ते या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धत बुधवारी 11:30 वाजता डहाणू विधानसभेचे नवनिर्वाचित माकपचे आमदार विनोद निकोले आणि पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी भेट दिली.


यावेळी 6 वी ते 8 वी मुलांच्या गटाचा कबड्डीचा सामना सुरू होणार होता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार निकोले यांनी बोर्डी संघाचे तर आमदार श्रीनिवास वनगा यांनी गंजाड संघाचे नेतृत्व करत मैदानात उतरल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. निकोले यांनी चढाई केली. वनगा यांनी निकोले यांना चक्रव्यूहात अडकविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, अन्य सहकारी खेळाडूंची साथ न लाभल्याने निकोले यांची चढाई यशस्वी ठरली.


दरम्यान दोन्ही आमदारांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे उपस्थित्यांनी कौतुक केले. तर नेटकाऱ्यांनीही सोशल मीडियावर फिरणाऱ्या दोन्ही आमदारांच्या व्हिडिओ आणि खिलाडीवृत्तीला पसंती दिली.

हेही वाचा - कांदा रडवणार! कांद्याने पार केली 'शंभरी'

ABOUT THE AUTHOR

...view details