महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात फेरीवाल्याची वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी - पालघर बातमी

नालासोपाऱ्यात फेरीवाल्याने एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

journalist-criticize-by-road-shopkeeper-in-palghar
नालासोपाऱ्यात फेरीवाल्याची वृत्तवाहिणीच्या पत्रकाराला दमदाटी

By

Published : Feb 12, 2020, 7:06 PM IST

Updated : Feb 12, 2020, 7:30 PM IST

पालघर- नालासोपाऱ्यात फेरीवाल्याने एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. याप्रकरणी फेरीवाल्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात फेरीवाल्याची वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला दमदाटी

हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग

नालासोपाऱ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले दुकान मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दरम्यान, नालासोपारा पूर्व तूळींज रोडवरील एका मोबाईल दुकानाच्या समोर एका फेरीवाल्याने भर रस्त्यात दुकान मांडले होते. ते एका पत्रकाराच्या निदर्शनास आले. पत्रकाराने फेरीवाल्याला त्याचे दुकान रस्त्याच्या कडेला घेण्याची विनंती केली. मात्र, पत्रकाराचे न ऐकता फेरीवाल्याने पत्रकाराला दमदाटी केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्ररणी फेरीवाल्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details