पालघर -पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याच्या सीमा भागात असलेल्या एका ग्रामपंचायतीने दीड किलोमीटर अंतरावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रच्या सीमा भागात असलेल्या वेवजी ग्रामपंचायत आणि गुजरातच्या सीमा भागात असलेल्या सोलसुंभा ग्रामपंचायतीचे वाद होत आहेत.
सीमा हद्द वाद चव्हाट्यावर -
पालघर जिल्ह्यातील वेवजी हे गाव तलासरी तालुक्यात येते. इथली ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही 5 ते 7 हजाराच्या आसपास असून हे अतिक्रमण हे 3 वर्षांपासून केल्याचे तेथील ग्रामस्थ सांगत आहेत. एकंदरित या सीमा भागात महाराष्ट्र आणि गुजरातच्या ग्रामपंचायती मध्ये सीमा हद्दी वाद चव्हाट्यावर आला आहे. दहा वर्षांपूर्वी असलेला महाराष्ट्र सीमेचा चिरा हद्द तेथून गायब झाल्याचा आरोप वेवजी ग्रामस्थ करीत आहेत. ही सीमा खुली करून द्यावी, अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांकडून होत आहे.
हेही वाचा - विदर्भाचा पारा आणखी घसरणार; 29 तारखेपासून थंडीच्या लाटेचा अंदाज