पालघर- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये रविवारी दुपारी घडला. सुलभा भुटाने (वय, ६०) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे आहे. तर किशोर भुटाने असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले.
विरारमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात - पत्नीची हत्या
रिक्षाचालक पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा - पालघरमध्ये मस्करीत गळा दाबल्याने तरुणाचा मृत्यू
विरार पूर्व जीवदानी रोड, बलोच नगर येथील न्यु बाळकृष्ण इमारतीत भुटाने दाम्पत्य राहत होते. पती किशोर रिक्षाचालक आहेत. अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. या वादात दोघांमध्ये अनेक भांडणेही झाली होती. दरम्यान पत्नी शरीर सुखासाठी नकार देत असल्याच्या कारणाहुन दोघांमध्ये रविवारी दुपारी वाद झाला. पती-पत्नीमधील हा वाद इतका विकोपाला गेला की पतीने धारधार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतः रक्ताने माखलेल्या अवस्थेत विरार पोलीस ठाणे गाठले व स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी विरार पोलिसांनी पती विरोधात हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.