महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नी व मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला उत्तर प्रदेशातील मिर्जापुर येथून अटक - पालघर बोईसर स्थानिक गुन्हे शाखा न्यूज

तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मृत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून या ठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आपले आडनाव पवार सांगत असलेली व्यक्ती मुळची उत्तर प्रदेशातील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

पालघर लक्ष्मी पवार सोनाली पवार खून न्यूज
पालघर लक्ष्मी पवार सोनाली पवार खून न्यूज

By

Published : Dec 19, 2020, 1:34 PM IST

पालघर - तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत एका सदनिकेत दोन महिलांचे मृतदेह आढळून आले होते. आरोपीने दोन महिलांची हत्या करून पळ काढला होता. त्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा तपास करत मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या पतीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून ताब्यात घेतले आहे.

कुजलेल्या अवस्थेत आढळले होते मृतदेह -

तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात एक 50 वर्षीय महिला तिच्या 30 वर्षीय मुलीसोबत राहत होती. 11 डिसेंबर रोजी आई लक्ष्मी पवार (वय 50 ) व मुलगी सोनाली पवार (वय 30) या दोघींचे मृतदेह बंद घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार 6 डिसेंबर रोजी घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.

हेही वाचा -सिंधुदुर्ग : शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून कलम बागेचे मोठे नुकसान

खोटी कागदपत्रे बनवून वावरत होता पती -

तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मृत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून या ठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आपले आडनाव पवार सांगत असलेली व्यक्ती मुळची उत्तर प्रदेशातील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

मिर्झापूर येथून आरोपी पतीला करण्यात आली अटक -

मृत महिलेच्या मुलाकडून मिळालेली माहिती व चौकशीच्या आधारे सर्वांचा तपास केल्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आरोपीला शोधत पोहोचले. खून करणाऱ्या पतीला मिर्झापूर येथून बोईसर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -परभणी : 4 बळी घेतलेल्या 'त्या' अपघाताचे आरटीओकडून ऑडिट

ABOUT THE AUTHOR

...view details