महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पालघरमध्ये उसळली गर्दी; तीन 'श्रमिक ट्रेन'च्या टोकनसाठी झुंबड

शहरातील रेल्वे स्थानकातून आज दिवसभरात उत्तर प्रदेशला जाणाऱ्या तीन श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यासाठी आर्यन स्कूलच्या मैदानावर कामगार आणि मजूरांची टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळ्याचे चित्र आहे.

labours in palghar
पालघरमध्ये उत्तर प्रदेशात जाण्यासाठी उसळली गर्दी

By

Published : May 20, 2020, 2:06 PM IST

Updated : May 20, 2020, 2:20 PM IST

पालघर - शहरातील रेल्वे स्थानकातून आज दिवसभरात उत्तरप्रदेशला जाणाऱ्या तीन श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यासाठी टोकन घेण्यासाठीआर्यन स्कूलच्या मैदानावर कामगार आणि मजुरांची मोठी गर्दी उसळ्याचे चित्र आहे.

पालघरमध्ये उत्तर प्रदेशात जाण्यासाठी उसळली गर्दी; तीन 'श्रमिक ट्रेन'च्या टोकनसाठी झुंबड
पालघर रेल्वेस्थानकातून वाराणसी, जौनपूर आणि सुलतानपूर या तीन ठिकाणी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी केलेल्या सर्व कामगार आणि मजुरांना आज आर्यन हायस्कूल मैदानात टोकन देण्यात येत आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच गावी परतणाऱ्या नागरिकांनी टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी केलीय. महसूल प्रशासनामार्फत या नोंदणीकृत नागरिकांना टोकन देण्यात येणार आहे. ट्रेनच्या वेळेनुसार टोकन मिळालेल्या नागरिकांना, पोलीस व महसूल प्रशासनमार्फत रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासन या मजुरांना विशेष रेल्वेने गावी रवाना करणार आहे.
पालघरमध्ये उत्तर प्रदेशात जाण्यासाठी उसळली गर्दी; तीन 'श्रमिक ट्रेन'च्या टोकनसाठी झुंबड
पालघरमध्ये उत्तर प्रदेशात जाण्यासाठी उसळली गर्दी; तीन 'श्रमिक ट्रेन'च्या टोकनसाठी झुंबड

तिसऱ्या टप्प्यात देशातील विविध भागातून आलेल्या मजूरांसाठी राज्यातून रेल्वे सोडण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई, पालघर तसेच औरंगाबाद, नांदेड या शहरांसह अन्य काही जिल्ह्यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर अडकलेल्या कामगार आणि मजूरांना गावी पाठवण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत.

Last Updated : May 20, 2020, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details