पालघर- जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पहाटेपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आहे. पालघर, सातपाटी, बोईसर किनारपट्टीवरील भागांत मुसळधार पाऊस तर ग्रामीण भागात ढगाळ वातावरणसह पावसाची संततधार सुरू आहे.
पालघरच्या किनारपट्टी भागात वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कच्च्या घरांचे नुकसान - rain in palghar
पालघरच्या किनारपट्टी भागात पहाटेपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आहे. पालघर, सातपाटी, बोईसर किनारपट्टीवरील भागात मुसळधार पाऊस तर ग्रामीण भागात ढगाळ वातावरणसह पावसाची संततधार सुरू आहे.
पालघरच्या किनारपट्टी भागात पहाटेपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात बुधवारी देखील जोरदार सरी बरसल्या. आता वादळाचा धोका कमी झाला असला तरीही मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.