पालघर - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार कायम आहे. तर, काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. तसेच, नदी-नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; अनेक रस्ते पाण्याखाली
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. तर, काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
पालघर-बोईसर रस्त्यावर सरावली येथे पाणी साचले आहे. तर, वाणगाव परिसरातही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाणगाव-डहाणू रस्त्यावर वाहतूक बंद आहे. बोईसर-चिल्हार रस्त्यावर बेटेगाव येथे पाणी साचल्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद आहे.