पालघर- जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले आहे. डहाणूमध्ये तर पावसाने कहरच माजवला आहे. सागर लॉज, चंद्रिका हॉटेल, इराणी रोड तसेच रेल्वे स्टेशनबाहेर पाणी साचले आहे. आत्ताही पावसाची रिपरिप सुरूच असून जर जोर आणखी वाढला तर रेल्वे सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये मुसळधार; आणखी जोर वाढल्यास रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची शक्यता - rain in palghar
पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा जोर आणखी वाढला तर रेल्वे सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये पाऊस
पालघर, केळवे, बोईसर, डहाणू भागात मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकणी पाणी साचले आहे. रविवार असल्याने शाळा, कॉलेज व कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी आहे. मात्र, घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे मोठे हाल झाले आहेत.