पालघर(वाडा) - गेल्या ३ दिवस संततधार कोसळत असल्यामुळे वाडा तालुक्यात सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशीच कोसळधार कायम राहिल्यास शेती कामांचा खोळंबा होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाडा तालुक्यात ३ दिवसाच्या कोसळधारेने पूरसदृश्य स्थिती; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला - farmer issue
अशीच कोसळधार कायम राहिल्यास शेती कामांचा खोळंबा होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाडा तालुक्यात ३ दिवस रिमझिम पावसाने सुरुवात होऊन २ दिवस मोठ्या कोसळधारेने शेतजमिनीत पुरपरिस्थिती निर्माण केली आहे. शेतजमिनीत काही दिवसांनी पेरलेले भात पीकही पाण्याखाली आले होते. वाडा तालुका व विक्रमगड हद्दीला लागून असलेली देहेर्जे नदी येथील ब्राह्मणगाव येथील कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
काही नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन गोऱ्हा-कंचाड ही रस्ते वाहतुकीवर दुपारच्या वेळी काही काळ ठप्प झाली होती. सर्वत्र पावसाने जोरदारपणे संततधार पकडल्याने जनसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. ही कोसळधार अशीच कायम राहिल्यास पालघर जिल्ह्यासह वाड्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.