वसई (पालघर)- निसर्ग चक्रीवादळापासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही उसंत घेतली नाही. वसई-विरारसह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याच प्रमाणे शहरात रात्री झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. यामध्ये सेंट्रल पार्कला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे.
वसई-विरारमध्ये पावसाची दमदार हजेरी, तुळींज सेंट्रल पार्क रस्त्याला तळ्याचे स्वरुप - वसई विरार पाऊस
वसई विरार मध्ये पावसाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तुळींज सेंट्रल पार्क रस्त्यावर पाणी साचले आहे.
वसई-विरारमध्ये पावसाची दमदार हजेरी
सध्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या सखलभागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वीच पालिकाप्रशासनाने नाले सफाईचे काम हाती घेतल्याने अनेक भागातील साठलेले पाणी तत्काळ ओसरले आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे.