पालघर- जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो पाण्याखाली गेला आहे. परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो पाण्यात; प्रवाशांचे हाल
पावसाची जोरदार बॅटींग होत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो पाण्याखाली गेला आहे. परिसरात पाणीच पाणी पहायला मिळत आहे.
पावसामुळे नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो गेला पाण्याखाली
नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो पाण्याखाली गेला असून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवासी रेल्वे स्टेशनवर येत आहेत. मात्र, आता पावसाने उसंत घेतली असून पाणी हळूहळू कमी होत आहे. मात्र, लोकल सेवा अजुनही धिम्या गतीने सुरू आहे.