पालघर -पालघर जिल्ह्यातील खानिवली परिसरात पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकूण 13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा टेम्पो दमणहून गुटख्याचा साठा भिवंडीकडे घेऊन जणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वाडा पोलिसांनी सापळा रचून खानिवली कंचाड रस्त्यावरील खानिवली येथे हा टेम्पो पकडला.
गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त, दोघांना अटक - पालघर क्राईम न्यूज
पालघर जिल्ह्यातील खानिवली परिसरात पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकूण 13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा टेम्पो दमणहून गुटख्याचा साठा भिवंडीकडे घेऊन जणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
जिल्ह्यात विविध ठिकाणी गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
पालघर जिल्हा हद्दीत येणाऱ्या मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर तलासरी, कासा, मनोर, पोलीस ठाणे परिसरामध्ये अनेकवेळा अवैध गुटखा वाहतूकीवर कारवाई करण्यात आली आहे. दमन, वापी भागातून या अवैध गुटख्याची वाहतूक मुंबईकडे होत असते. या अगोदर देखील दापचारी तपासणी नाक्यावर अवैधपने गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आयशर टेम्पोंना पोलिसांनी पकडले होते. यात दोन वाहनासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान आज केलेल्या कारवाईमध्ये एकूण 13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार सरोज आणि रवी तुसामत अशी या आरोपींची नावे आहेत.