'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सिरीज 2019' जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणीचे स्वगृही जल्लोषात स्वागत - कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही (तारापूर) जल्लोषात स्वागत
इंग्लंड येथे झालेल्या 'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सीरीज 2019' स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने जिंकले. या विजेत्या संघाचा कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही (तारापूर) येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तारापूर परिसरातील नागरिकांनी विक्रांतची भव्य मिरवणूक काढली होती.
दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार विक्रांत केणी
पालघर - इंग्लंड येथे झालेल्या 'दिव्यांग क्रिकेट वर्ल्ड सीरीज 2019' विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी याचे स्वगृही आगमन झाले. तारापूर येथे मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी तारापूर परिसरातील नागरिकांनी विक्रांतची भव्य मिरवणूक काढली होती.