पालघर - पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत एकता नगर मधील अनिल काशिनाथ वाणी, राजेंद्र काशिनाथ वाणी आणि इतर असे आदिवासी समाजाचे कुटुंब राहते. या कुटुंबाने नगरपंचायती दप्तरी नोंद असलेल्या बांधकामपेक्षा वाढीव बांधकाम केले आहे. तसेच सार्वजनीक रस्ता अतिक्रमण केल्याच्या नोटीसा या कुटुंबांना नगरपंचायतीने पाठविल्या आहेत. वाढीव बांधकाम तातडीने हटविण्यासाठी नगरपंचायतीने जव्हार इथल्या नगरपरिषदकडून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याचप्रमाणे जेसेबी व इतर यंत्रणा उभी करण्यात आली.
नगरपंचायतीच्या या कारवाईवर इथल्या आदिवासी एकता परिषदेने आक्षेप नोंदवून नगरपंचायतीच्या कार्यालयात अधिकारीवर्ग आणि वाढीव बांधकाम केलेले कुटुंबियांनी याबाबत चर्चा केली. त्यामूळे ही कारवाई तुर्तास थांबली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई का नाही-