पालघर - मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खासगी बस २५ फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३९जण जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी असलेल्या १७ प्रवाशांना नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ही खासगी बस (GJ १७ UU ११४८) बसमधील सर्व भाविक गुजरातमधील सुरत या शहराचे रहिवासी आहेत. हे सर्व प्रवासी शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन घेऊन डहाणूतील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरून पालघरला येत असतानाचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळली. बसला दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
या बसमध्ये ४१ प्रवाशी आणि ४ चालक होते. जखमी व्यक्तींना त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आमरे यांनी दिली आहे. गंभीर जखमी असलेल्या १२प्रवाशांना नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नाशिकच्या रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची नावे खालील प्रमाणे -
- जैनेश राणा
- उमेश राणा
- महेश राणा
- आशयाबेन भजियावाली
- दक्षा सय्यब पुरा
- सिराबेन पानवाला
- मयूर सिंगवाला
- अंकिता प्रजापती
- हेमाबेन केरावाला
- मैनाबेन राणा
- सूर्यकांत गाडे
- महेश मणिलाल
- राणू बेन सेन
- राजन सेन
- उमेश राणा