महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 29, 2021, 1:08 PM IST

Updated : Mar 29, 2021, 1:53 PM IST

ETV Bharat / state

पालघर; होळीच्या दिवशीच झाली संसाराची राख रांगोळी; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राह्मण पाडा या गावात घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.

भीषण आग
भीषण आग

पालघर-ऐन होळीच्या रात्री घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालघर तालुक्यातील ब्राह्मण पाड्यात लागलेल्या आगीत वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुले जखमी झाले आहेत.

भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राह्मण पाडा या गावात रविवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. अनंता मोळे यांच्या घराला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी घरात एकूण सात जण होते. घरमालक अनंता मोळे, त्यांची चार मुलं, पत्नी आणि वृद्ध आई आगीत अडकले. या घटनेत अनंता मोळे यांची दोन मुले, आई आणि पत्नीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीच्या घटनेत अनंता मोळे आणि दोन मुले बचावली आहेत. जखमींना मुखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून आगीत मौळे यांच्या मालकीचे घर आणि त्यातील साहित्य संपूर्ण जळून खाक झाले आहे.

मृत्यू झालेल्यांची नावे

1. आई – गंगुबाई मोळे
2. पत्नी – द्वारका अनंता मोळे
3. मुलगी – पल्लवी अनंता मोळे
4. मुलगा – कृष्णा अनंता मोळे

नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु

1. अनंता मोळे
2. मुलगी – अश्विनी अनंता मोळे
3. मुलगा- भावेश अनंता मोळे

Last Updated : Mar 29, 2021, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details