ठाणे -पालघर येथील बहुचर्चित मॉब लिचिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना मंगळवारी जामीन मिळाला आहे. ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी या चार आरोपींना काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. या आरोपींवर कसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. अटक आरोपींपैकी चार आरोपींनी जामिनासाठी विशेष सेशन न्यायालयात अर्ज केला होता. त्यांना जामीन मिळाला आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपींच्या जामिनावर 26 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील चार आरोपींना जामीन - Palghar Crime News
पालघर येथील बहुचर्चित मॉब लिचिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना मंगळवारी जामीन मिळाला आहे. ठाणे सेशन न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी या चार आरोपींना काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. या आरोपींवर कसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील चार आरोपींना जामीन
मंगळवारी ठाणे विशेष सेशन न्यायालयाने पालघर मॉब लिचिंग प्रकरणातील आरोपी नितीन जाधव, मनोज जाधव, लक्ष्मण जाधव आणि तुकाराम साठे यांना जामीन मंजुर केला आहे. या चार आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली व त्यांना जामीन मंजुर करण्यात आला. या सर्वांवर कसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.