महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' कारणांमुळे ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी; मत्स्यव्यवसाय विभागाचा निर्णय - 31 july

मत्स्यसाठ्यांचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व आर्थिक हानी पोहोचू नये, त्यांचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या अधिकारान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे .

मासेमारी बंदी

By

Published : Jun 1, 2019, 10:17 AM IST

पालघर- जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. त्यामुळे आजपासून (१ जून) ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे. त्याचबरोबर या कालावधीत खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठीही मासेमारी बंद करण्यात आली आहे.

आजपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी

मत्स्यसाठ्यांचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व आर्थिक हानी पोहोचू नये, त्यांचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या अधिकारान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागातर्फे जारी करण्यात आले आहेत.

जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे हा या बंदीमागचा उद्देश आहे. त्यामुळे सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी किलोमीटरपर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

या बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मत्स्यसंवर्धनासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट अशी ९१ दिवसाची मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी -

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव तर पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू तालुक्यातील डहाणू, धाकटी डहाणू, झाई-बोर्डी या भागातील १ हजार २०० ते १ हजार ५०० मच्छीमार बोटीद्वारे पापलेट, दाढा, घोळ, शेवंड, बोंबील आदी माश्यांची मासेमारी केली जाते. दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होत आहे. पापलेट, दाढा, घोळ, बोंबील, शेवंड आदी मच्छीमाराना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मत्स्यसंपदा नामशेष होतात की काय अशी अवस्था निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या संघटनांनी १५ मे ते १५ ऑगस्ट अशी ९१ दिवसाची मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी शासन दरबारी अनेक वर्षापासून केली आहे.

समुद्रात माश्यांनी टाकलेल्या अंड्यातून निघालेल्या लहान पिल्लांची होणारी मासेमारी(कत्तल) थांबून मत्स्यउत्पादनात वाढ व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, या मागणीचा कुठलाही सकारात्मक विचार न करता शासनाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै असा अवघ्या ६१ दिवसाची बंदी घोषित करून मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच दिल्याची भावना मच्छीमार बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details