पालघर-चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबतच मच्छीमारांना देखील बसला आहे. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी बंदीचा परिणाम बाजारावर झाला आहे. बाजारात माशांचा तुटवडा जाणवू लागला आहे. बंदरापासून ते ग्रामीण भागातील बाजारपेठेत मासे दाखल होत असताना ती महाग किंमतीने विकली जात आहे. त्यामुळे चवीने मासे खाणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पालघरमध्ये चक्रीवादळाचा मत्स्यव्यवसायाला फटका; मच्छी महागाईने खवय्यांचे हाल - मच्छी महागाईने खवय्यांचे हाल पालघर बातमी
पालघरसह राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. 'क्यार' वादळानंतर चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. यात शेतकऱ्यांसह मच्छीमारी व्यवसायावर परिणाम झाला. किनारपट्टीवर समुद्रात मच्छीमारी करणाऱ्यांना 4 महीने बंद घातली आहे.
हेही वाचा-...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार
पालघर सह राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. 'क्यार' वादळानंतर चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. यात शेतकऱ्यांसह मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला. किनारपट्टीवर समुद्रात मासेमारी करणाऱ्यांना 4 महीने बंद घातली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर मासेमारीचे हंगाम असते. या कालावधीत केलेली मासेमारी ही वर्षभर उत्पन्नाचे साधन बनते. मात्र, यावेळी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळाने राज्यातील कोकण किनारपट्टीवरची मासेमारी धोक्यात आली. चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने 'हाय अलर्ट' जारी केला होता. त्यामुळे इथल्या बंदरपट्टीतील मासेमारी करणाऱ्या दोनहजारहून अधिक बोटी माघारी बोलविण्यात आल्या. याचा फटका मत्स्यव्यवसायाला बसला आहे. परिणामी माशांचे दर गडाडले आहेत.
शासनाने प्रत्येकी सिलिंडर नौकेस एक लाख रूपये भरपाई द्यावी. तसेच मत्सव्यवसाय अडचणीत आल्याने शासनाने 2 हजार 100 कोटी रूपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पालघर येथील ठाणे-पालघर मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष नारायण काशिनाथ विदे यांनी केली आहे.