पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक टी-101 मध्ये हर्षल केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या नऊ बंबांच्या मदतीने तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कंपनीतील बिनय कुमार बिंद (वय 40) आणि हेमंत बारी (वय 42) हे दोन कामगार जखमी झाले. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला आग; दोन कामगार जखमी
तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर टी 101 मध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. 'हर्षल केमिकल' असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे.
हेही वाचा - तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे देणार - पोलीस अधीक्षक
मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हर्षल केमिकल कंपनीला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कामगारांनी कंपनीबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या बोईसर आणि वसई येथील नऊ बंब आणि 15 टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. पालघरचे आमदार श्रीनिवाास वनगा यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.