महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मागील निवडणुकीत आमच्यासह मित्रपक्षातील सगळेच विकले गेले, हितेंद्र ठाकूर यांचे खळबळजनक वक्तव्य - ncp

आपल्या भाषणाचा शेवट करताना 'आपलं मत शिट्टीला', असे ठाकूर म्हणाले, यावेळी सभेत एकच हशा पिकला. कुणी पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरु शकत नाही, असे म्हणत आपली निशाणी "रिक्षा" असे सांगत ठाकूर यांनी दुरूस्ती केली.

हितेंद्र ठाकूर यांचे खळबळजनक वक्तव्य

By

Published : Apr 22, 2019, 2:57 PM IST

पालघर- मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च झाला. त्यावेळी आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही? असा सवालही बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी ढेकाळे येथे आयोजित उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारसभेत केला. त्यामुळे बहुजन विकास आघाडी बरोबर असलेल्या मित्र पक्षांची चांगलीच गोची झाली.

हितेंद्र ठाकूर यांचे खळबळजनक वक्तव्य

मात्र, आता आपण सर्व एकत्रीत आहोत. मागचे सारे विसरून आता जोमाने कामाला लागा. पुढचे दिवस आपले असतील, असेही ठाकूर यावेळी म्हणाले. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून, पाच वर्षांनी त्यांचे चिरंजीव येऊन आम्हाला गुंड म्हणतात. मग या ५ वर्षांत ते सत्तेत होते त्याचे काय? असे म्हणत ठाकूर यांनी शिवसेनेवर टीका केली.

आपल्या भाषणाचा शेवट करताना 'आपलं मत शिट्टीला', असे ठाकूर म्हणाले, यावेळी सभेत एकच हशा पिकला. कुणी पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरु शकत नाही, असे म्हणत आपली निशाणी "रिक्षा" असे ठाकूर म्हणाले. आपली निशाणी चोरली असल्याचा आरोपही हितेंद्र ठाकूर यांनी या प्रचारसभेत केला.

ABOUT THE AUTHOR

...view details