पालघर -जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसर शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत.
पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; घराच्या भितींना तडे - पालघर भूकंप न्यूज
पालघर आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी नोंदली गेली आहे.
पालघर परत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
हेही वाचा - दिल्ली पश्चिममधील मुंडका परिसरात भीषण आग, 21 अग्निशामक गाड्या घटनास्थळी
दापचरी, बोर्डी, कासा, उधवा, धुंदलवाडी येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. मागील तीन दिवसांपासून डहाणू परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Last Updated : Dec 14, 2019, 9:40 AM IST