पालघर- जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचा धक्का बसला आहे. रात्री ११.३९ वाजताच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला असून त्याची तीव्रता ३.० रिक्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघरमध्ये भूकंपाचा झटका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - earthquake palghar
आधीच जिल्ह्यातील नागरिक कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमाणामुळे धास्तावले आहे. त्यातच काल निसर्गानेही आपला प्रकोप दाखवला. जिल्ह्यातील डहाणू, कासा, धुंदलवाडी, तलासरी, उंबरगाव, बोर्डी आणि घोलवड या परिसरात भूकंपाचा झटका जाणवला. डहाणू, तलासरी परिसरात गेल्या दीड वर्षापासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरू आहे.
आधीच जिल्ह्यातील नागरिक कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमाणामुळे धास्तावले आहे. त्यातच काल निसर्गानेही आपला प्रकोप दाखवला. जिल्ह्यातील डहाणू, कासा, धुंदलवाडी, तलासरी, उंबरगाव, बोर्डी आणि घोलवड या परिसरात भूकंपाचा झटका जाणवला. डहाणू, तलासरी परिसरात गेल्या दीड वर्षापासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरू आहे. काल आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन इफेक्ट : मुंबई- अहमदाबाद महामार्गालगत ट्रक चालकांचे हाल