महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डहाणू परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का;  3.4 रीश्‍टर स्केलची नोंद - बोर्डी

डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.4 रीश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Sep 22, 2019, 4:56 PM IST

पालघर-जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज (रविवारी) 12.47 वाजताच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्‍टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. कासा, धुंदलवाडी, तलासरी, उंबरगाव, बोर्डी, घोलवड या परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा - पालघर : डहाणू-तलासरीत भूकंपाचे धक्के

डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी 3.5, 3.2, 2.6 रीश्‍टर स्केल तीव्रतेचे तीन धक्के तर शनिवारी 3.2 रीश्‍टर स्केलचा धक्का आणि आज 12.47 वाजताच्या सुमारास पुन्हा 3.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. पुन्हा एकदा सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - बोईसर-खैरापाडा येथे टँकर वेल्डिंग करताना स्फोट; वेल्डर ५२ टक्के भाजला

ABOUT THE AUTHOR

...view details