पालघर - परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकावर पाणी फेरले आहे. भात पिकाची अवस्था अंतिम टप्प्यावर असतानाच पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पालघरमध्ये मुसळधार पावसाने भात शेतीचे नुकसान हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा या भागात रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात 75 हजार हेक्टरवर भात शेतीच केली जाते. मात्र परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात पीक पूर्णपणे तयार झाले होते. सध्या जिल्ह्यात भात कापणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पावसाचे पाणी साचले आहे. वाळत टाकलेले भात पीक पाण्याने सडून गेले आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा हताश झाला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने हाती आलेल्या पिकांवर पाणी फेरले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - 'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'