महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरारोडवरील शबरी हॉटेलमध्ये दुहेरी हत्याकांड; बारच्या टाकीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचे सापडले मृतदेह - मीरा रोड दुहेरी हत्याकांड

एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी फॅमिली रेस्टॉरंटमधील पाण्याच्या टाकीत दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नरेश शेट्टी आणि हरेश शेट्टी, अशी दोघांची नावे असून हे दोघेही याच हॉटेलमध्ये काम करत होते.

Sabari Hotel
शबरी हॉटेल

By

Published : Jun 5, 2020, 3:42 PM IST

पालघर - मीरारोड येथील एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी फॅमिली रेस्टॉरंटमधील पाण्याच्या टाकीत दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. नरेश शेट्टी आणि हरेश शेट्टी, अशी दोघांची नावे असून हे दोघेही याच हॉटेलमध्ये काम करत होते.

मीरारोड येथील शबरी हॉटेलमध्ये दुहेरी हत्याकांड

मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या टाकीतून कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतांच्या शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे या दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात हे हॉटेल बंद होते. बहुतांश कामगार आपापल्या गावी गेले होते. मात्र, काल हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हॉटेल मालकाला पाण्याच्या टाकीतील मृतदेहांबाबत माहिती दिली. हॉटेल मालकाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details