वसई - डॉल्फिन मासा उड्या मारताना बघण्यासाठी पर्यटक पैसा खर्च करून भरपूर प्रवास करायला तयार असतात. मात्र, डॉल्फिन कळपाने पोहत असल्याचे काही दिवसांपूर्वी वसईतील २ नशीबवान युवकांना राजोडी समुद्र किनारी ७ ते ८ डॉल्फिन मासे मजेत विहार करताना मोफत बघायला मिळाले. यावेळी स्थानिक तटरक्षक युवकांनी स्पीड बोटच्या मदतीने डॉल्फिनचे दृश्ये मोबाईलमध्ये चित्रीत केली आहेत.
वसई समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फीनचा कळप; पर्यटकांच्या मोबाईलमध्ये दृश्य कैद - डॉल्फिन
आता वसईकरांनाही यापुढे डॉल्फिन पाहण्यास मिळणार आहे. खोल समुद्रात आढळणारे डॉल्फिन वसईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
समुहाने राहणारे डॉल्फिन वसईतील समुद्रातदेखील समुहानेच पाण्यातून उड्या मारताना दिसले. नरीमन पॉईन्टजवळच्या समुद्रातही काही दिवसांपूर्वी डॉल्फीन मासे बघायला मिळाले होते. मात्र, आता वसईकरांनाही यापुढे डॉल्फिन पाहण्यास मिळणार आहे. खोल समुद्रात आढळणारे डॉल्फिन वसईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतात गोड्या पाण्यात डॉल्फिन आढळतात. मुंबई, पालघर, डहाणू नजीकच्या समुद्रात आतापर्यंत जे डॉल्फिन आढळले आहेत ते मृतावस्थेत होते. मात्र, वसईच्या राजोडी समुद्र किनारी डॉल्फिन दिसल्याने समाधानाचे वातावरण आहे.
वसई समुद्रकिनारी आलेले हे डॉल्फिन किती काळ राहतील? याबद्दल माहित नाही. मात्र, त्यांना पाहण्यासाठी गर्दी कायम असल्याचे वसईकर सांगतात.