पालघर/वसई -वसईच्या उसगाव येथील 100 बेडच्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी सरकारचे आदिवासी बहूल जिल्ह्याला जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्राने राज्याला इतर राज्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा केल्याचे सांगितले.
वसईच्या उसगाव येथील कोविड केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
वसईच्या उसगाव येथील 100 बेडच्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्ष ताशेरे ओढले.
उसगाव येथील श्रमजीवी कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्याला 1800 टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. इतर राज्यांपेक्षा जास्त 4 लाख 75 हजार रेमडेसिवीरचा साठा केंद्राकडून उपलब्ध करून दिल्याचे नमूद करताना राज्य सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्ष ताशेरे ओढले. महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणजे जेथे पॉवरफूल मंत्री तेथे ऑक्सिजन, जेथे पॉवरफूल मंत्री तेथे रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याचा आरोप करताना पालघरसारख्या आदिवासीबहूल जिल्ह्याला अनाथासारखी वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.