महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर - corona update

३८ वर्षीय गर्भवती महिलेचा मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे वसईतील कोरोनामुळे मृतांची संख्या 3 झाली.

वसई-विरारमध्ये 'कोरोना'च्या मृतांचा आकडा 3 वर
वसई-विरारमध्ये 'कोरोना'च्या मृतांचा आकडा 3 वर

By

Published : Apr 7, 2020, 11:17 AM IST

पालघर/वसई- नालासोपारा पेल्हार येथील ३८ वर्षीय गर्भवती महिलेचा मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे वसईतील कोरोनामुळे मृतांची संख्या 3 झाली.

ही महिला नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होती. उपचारादरम्यान तिची कोरोना चाचणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ती ९ महिन्यांची गर्भवती होती. तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला होता, पण तिचा अहवाल आज प्राप्त झाला.

या महिलेस दिड वर्षांची मुलगी व पती असा परिवार आहे. पालिकने त्यांना 'आयसोलेट' केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला असून त्या ठिकाणचा परिसर सील केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details