महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुजरातच्या उंबरगावातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला कुर्झे धरणात - talasari police news

गुजरात राज्यातील उंबरगावात राहणाऱ्या होलसेल तेलाच्या व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणात दगड बांधून फेकण्यात आला होता. गावकऱ्यांना मृतदेह कुर्झे धरणात तरंगताना आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. अखेर तरुणाची ओखळ पटली आहे.

talasari police news
गुजरातच्या उंबरगावातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला कुर्झे धरणात

By

Published : Nov 11, 2020, 8:50 PM IST

पालघर - गुजरात राज्यातील उंबरगावात राहणाऱ्या होलसेल तेलाच्या व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणात दगड बांधून फेकण्यात आला होता. गावकऱ्यांना मृतदेह कुर्झे धरणात तरंगताना आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यामध्ये निलेशकुमार चुणीलाला रावल असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. सध्या आरोपीचा शोध तलासरी पोलीस घेत आहेत.

गुजरातच्या उंबरगावातील बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला कुर्झे धरणात

हत्या करून मृतदेह फेकला कुर्झे धरणात

निलेशकुमार चुणीलाला रावल हे गुजरातमधील होलसेल तेलाचे व्यापारी आहेत. उद्धवा आणि तलासरी शहरात त्यांचे ग्राहक होते. या निमित्ताने ते सतत पालघरमध्ये येत असत. 3 नोव्हेंबर रोजी ऑर्डर घेण्यासाठी आलेले कुमार रावल हे घरी परतलेच नाहीत. त्यांच्या पत्नीने 4 नोव्हेंबर रोजी पती हरवल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली.

पोलिसांनी मृतदेह तलावाबाहेर काढून त्याची ओळख पटवली.

8 नोव्हेंबरला (रविवारी) दुपारच्या सुमारास तलासरी येथील कुर्झे धरणात गावकऱ्यांना एक मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह तलावाबाहेर काढून त्याची ओळख पटवली. संबंधित मृतदेह निलेशकुमार चुणीलाला रावलचा असल्याचे स्पष्ट झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी रावल यांच्या मारेक्यांनी कंबरेला मोठा दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकून दिला. त्यांच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याचे कळते.

तलासरी पोलिसांनी अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करणे इत्यादी कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला असून सध्या मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस निरीक्षक अजय वसावे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details