महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2020, 11:13 AM IST

ETV Bharat / state

कर्तव्यनिष्ठा; गुन्हे शाखेच्या महिलांकडून बंदोबस्तावरील पोलिसांना पाणी, बिस्कीट वाटप

कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असल्याने पोलिसांच्या खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या रणरागिणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या मदतीला धाऊन आल्या आहेत.

woman
पाणी, बिस्कीट वाटताना गुन्हे शाखेच्या महिला

पालघर - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू केल्याने पोलीस बंदोबस्तावर तैनात आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतील गुन्हे शाखेच्या रणरागिणी धाऊन आल्या आहेत.

कर्तव्यनिष्ठा; गुन्हे शाखेच्या महिलांनी बंदोबस्तावरील पोलिसांना केले पाणी, बिस्कीट वाटप

राज्यातील पोलीस प्रशासन आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत आहेत. दिवस-रात्र रस्त्यांवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पालघरमधील पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन पाणी आणि बिस्कीट वाटप केले. एकूणच राज्यात कडेकोट बंद असताना पोलीस प्रशासनातील कर्मचारी उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावतात. मात्र आशा वेळी कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे मोठे हाल होतात त्यांच्या सहकारी महिलांनी बिस्कीट आणि पाण्याचे वाटप करत एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details