पालघर - दुधाच्या टँकरमधून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कल्याणहून राजस्थानला घेऊन जाणारा टँकर तलासरी पोलिसांनी पकडला आहे. या दुधाच्या टँकरमध्ये तब्बल 12 जण आत बसले होते. पोलिसांनी टँकरचालक व नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
दुधाच्या टँकरमधून कामगारांची वाहतूक; टँकरचालकासह 12 जण पोलिसांच्या ताब्यात - कोरोना प्रसार
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्या तरी अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू आहे. याचा वापर करून काही कामगार दुधाच्या टँकरमधून परिवारासह कल्याणहून राजस्थानकडे निघाले होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत, मात्र अत्यावश्यक सेवांची वाहतूक मात्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टँकरचालकाने शक्कल लढवत आपल्या दुधाच्या टँकरमध्ये कामगार व त्यांचा परिवार घेऊन कल्याणहून राजस्थानकडे निघाला होता. मात्र, तलासरी पोलिसांनी या टँकरची झडती घेतली असता, आतमध्ये 12 जण आढळून आले. टँकरसह टँकरचालक आणि कामगारांना तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.