पालघर -कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा अखेर संपली असून पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस बुधवारी रात्री दाखल झाली आहे. पालघरमधील मध्यवर्ती औषध भांडारमध्ये ही लस ठेवण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्धे अर्थात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस दाखल 6 ठिकाणी लसीकरण केंद्र-
पालघर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उप रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय वाडा, ग्रामीण रुग्णालय आणि पालघर या ठिकाणी तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये वरून इंडस्ट्रीज या सहा ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. 16 जानेवारी पासून लसीकरणच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी प्रत्येक लसीकरण केंद्रात प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस दाखल आरोग्य विभाग लसीकरणासाठी सज्ज- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आरोग्य विभागामार्फत रंगीत तालीम अलीकडेच घेण्यात आली आहे. 16 जानेवारीला सुरू होणाऱ्या लसीकरणाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.